Sunday, March 1, 2015

प्रेम …
सूर्य मावळायला लागला की
पायांनी तुझी वाट धरणं
बोललीस काहीतरी छान की
अलगद तुझा हात धारण  ।।

आपलंस  चंद्राच चांदण
हलकेच मनाच  माझ्या
तुझ्याकडे रांगण

तुझ्या डोळ्यात
खोल खोल गुंतण
आठवणीत तुझ्या
रात्र रात्र जागण

तुझ्या वाटेत
निपचित पडून राहण
तुझ्या  हसण्या वर
मोर पिसासारखं वाहण

तुझ्या आनंदात
बेभान होऊन नाचण
आणि माझ्या दु:खाला तुझं
अश्रूंनी न्हाऊ घालण

दोन  थेंब पडताच पावसाचे
तुझी आठवण येण
यालाच म्हणतात ना
कुणावर प्रेम जडण

- अमित जहागीरदार
२३ एप्रिल २०००
सांगली

 

No comments:

Post a Comment